Maza Mat Kunala? (Whom should I vote?)

कमळ कोपर्यात पडलं होत, एके काळी उमीद दाखवणार हे फुल जणू स्वतः च उमीद हरले होते. पंजा गेल्या अनेक वर्षानसारखा आजहि उभा होता (कारण त्याला फक्त उभच राहायच होत). तो आश्वासन देत होता कि विरोध करेल त्याला गालावर मारणार हे कुणास ठाऊक. घड्याळ मात्र पंजाच्या खाली म्हणजे मनगटावर अगदी चिटकून बसल होत आणि भिंती वर पण होत आणि table वर अलार्म clock ची पण भूमिका करत होत जणू बिन बुडाच्या भांड्या सारखी त्याची अवस्था होती. एरवी अचूक निशाना असलेल्या धनुष्य बाणाला मात्र दिग्ज धनुर्धार्याची उणीव भासत होती. कुठून तरी engine चा आवाज आला. ३ बेल झाल्यावर जस नाटक चालू होणार हे प्रेक्षकांना कळत तसेच engine चा आवाज ऐकून, निवडणूक जवळ आली आहे हे लोकशाहीतल्या नगर्वासियाना कळले. या निवडणुकांची जादूच निराळी! लाखो तक्रारी करून जे रस्त्यावरचे खड्डे बुजले नाहीत  त्यात आता नुसता मुरूमच  नाही तर चक्क डांबर भरून रोड रोलर फिरत होत. वीज नसलेल्या शेतात आता डीझेल पम्प बसू लागले होते. पतंगीला मात्र संक्रांति नंतरच जोर आला होता, किती उंच उडू कि कितीना कlपू या तिच्याच मांजाच्या गुंत्यात ती अडकली होती. ऑस्ट्रेलियात जरी batting ने निराशा केली असेल तरी गल्लीत मात्र  फलंदाजlला “मी यशस्वी करणार” असं bat म्हणत होती. प्रगती साठी इतके सगळे पुढे आल्यावर गजराजाने पण बाजूच्या cycle ला धक्का देत गेस्ट अपेअरंस दिला. विमानाने आकाशातले ट्राफिक चे प्रोब्लेम सोडवण्याची ग्वाही दिली. एरवी निमूट बसणारी कप बशी आता महिला आरक्षित प्रभागात हळदी कुंकूला अनोळखी पाहुण्यांना “माझ्या मुळे चहा आहे तुम्हाला” हे  सांगत होती. तिचा रुबाब बघून गेस सिलेंडर नळी ला घेउन “चहा माझ्या मुळे शक्य झाला ” हे जोरजोरात ओरडत होता. खाली अंगणात ” आमच्या मुळे मळ्यात चहा उगवला आहे” अस विळा निष्फळ ओरडत होते. या सगळ्या प्रकरणात सर्वोपयोगी नारळाचा काही आवाज नव्हता. जसे निवडणुकीचे दिवस जवळ आले तसे पेच अजूनच वाढले. पाच वर्षात जितकी प्रगती झाली नव्हती ती आता count down च्या काळात होत होती. रस्ते निट झाले, नवनवीन गार्डेन होऊ लागले, विविध सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले. हळदी कुंकू ला नेहमी पेक्षा जास्त घरांमधून आमंत्रणं येऊ लागली, मंदिरांना आणि नवग्रह पूजेला काही औरच महत्व आले. अहो तुळशीच्या लग्नाची पत्रिका कार्यवाहाकांच्या फोटो आणि नावा सकट प्रत्येक गल्लीत दहा बाय दहाच्या फलकांवर “आग्रहाचे आमंत्रण म्हणून” लावली होती. शेवटच्या पाच दिवसात तर कमालच झाली. रंगमंच सज्ज झाले, नारळ फुटले आणि भाषणांना सुरवात झाली. टीवी वाले चोवीस तास दिगजांचे भाषण, चर्चा, नागरिकांचा कल हेच दाखवत होते. इतके डिटेलस होते कि काका पुतण्यांचे एकमेकांचे निरोप पण सर्वसामान्यान पर्यंत टीवी पोहोचवत होता. त्यामुळे एरवी बिना कारण news मधे असणार्या फिल्म स्टार्स आणि हरणाऱ्या क्रिकेटर्स ला विश्रांती होती. इच्छुक उमेदवारांचे प्रयत्न टीवीवर जोरदार झळकत होते. कुणी फ्री मधे बिल्डिंग रंगून दिल्या तर कुणी महिलांसाठी मोफत कार्यशाळा आयोजित केल्या. कुणी काही वाटले तर कोणी काही. कुणी इतके पैसे दिले कुणी तितके. हे सगळे कशा साठी? “विजयी करा विजयी करा विजयी करा”, “तुमचे मत आम्हालाच द्या”, नेहमी परस्पर विरोधी बोलणारे पक्ष आता हि  एकच भाषा बोलत होते. पंजा पंजा पंजा, घड्याळ  घड्याळ, कमळ कमळ , धनुष्यबाण ह्या यांच्या नार्यानमधे रोड रोलर, engine , डीझेल पम्प यांचा मोठमोठ आवाज कानाचे पडदे फlडत होता. कपबशा, गेस सिलेंडेर आणि विळा पाटी ची कुरकुर डोकं चक्रावून टाकत होती. इतक्या आवाजात माझी अवस्था चक्रव्हुतल्या अभिमन्यू सारखी होती. कानामध्ये एकच आरडा ओरडा “विजयी करा” “पंजा” “कमळ”, डोकं बधीर झाल होत, कपाळाच्या आठ्या अगणित वाढल्या होत्या, हाताला सरसून घाम सुटला होता, हृधयाचे ठोके जोरजोरात चालू होते…”विजयी करा विजयी करा”…आणि मी झोपेतून धाडकन जागी झाले. मनात एकच प्रश्न होता … माझ मत कुणाला? या गोंधळात मतदानाला जाऊच नाही असाही विचार आला, पण ती माझी हार होती, लोकशाहीचा तो अपमान झाला असता म्हणून मतदानlला तर जायचच होत. आत जाई पर्यंत माहित नव्हता कुणाला मत द्यायच आहे, सारी चिन्ह दिवसा दिसणाऱ्या तार्यानप्रमाणे माझ्या डोक्याशी फिरत होती, मी मी म्हणत होती. ती सगळी चिन्हे त्या इलेक्ट्रोनिक मशीनवर कधी जाऊन बसली, मला कळलच नाही. माझ मत कुणाला? हा प्रश्न  अजूनही सुटला नव्हता. तिथली सगळी मंडळी इतका का वेळ लागतो म्हणून माझ्याकडे वैतागून पाहत होती .  तेवढ्यात ऑफिसर ने मला मत द्या म्हणून आठवण करून दिली. मी डोळे बंद केले मनात एक विचार केला, माझ मत योग्य माणसाला मिळावे, निवडून आल्यावर जो / जी प्रभागाची काम करेल, प्रगती करेल अश्याच व्यक्तीला माझ मत मिळाव आणि असाच नगरसेवक निवडून यावा. नकळत बटन दाबल गेल आणि बिब आवाज आला आणि ऑफिसर म्हणाला “तुमच मतदान पूर्ण झाल”. पण अस डोळे झाकून मत देउन खरच काही देशाची प्रगती होणार आहे का? परिवर्तन येणार का? हितर फक्त लोकशाही वरची अंधश्रद्धा होईल. या प्रश्नाचे एक solution असू शकते कि इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन वरच  “वरील पेकि कुणीच नाही” हा परियाय द्यावा. जेणेकरोन योग्य उमेदवार नाही म्हणून मतदानाचा काय उपयोग, अस म्हणून मतदार घरी नाही थांबणार आणि लोकशाहीत तो खरा मतदानाचा हक्क होईल, सक्ती नाही.

Advertisements
This entry was posted in Think! and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s