थोड वेडे व्हा!

उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ, सगळीकडे शुकशुकाट. सोसायटीतली घरी असलेली मंडळी पंख्याच्या गार हवेत वामकुक्षी घेत होती. या शांततेचा फायदा घेत काही बालगोपाळ एकत्र जमले आणि झाडावर चढून आंबे खायचा प्लान ठरला. हळूच एक जण झाडावर चढला, काही आजुबाजूला नजर ठेवून होते तर काही वरून येणाऱ्या आंब्याला झेलायच्या तयारीत! सगळं काही प्लान प्रमाणे चालले होते आणि एक आंबा हातात येणार तेवढ्यात धाड कन आवाज झाला…पोर घाबरून जागीच गारठली …घरातील सगळे धावत बाहेर आले…आंब्याच्या ऐवजी छोटा सचिनच झाडावरून पडला होता! दिवसेंदिवस छोट्या सचिन चे उद्योग वाढतच होते आणि परत असा वेडेपणा करू नये  म्हणून  लगेचच त्याला cricket  च्या coaching ला घालण्यात आले. पण घरच्यांना काय माहित होते कि क्रिकेट मध्ये तो इतका वेडा होईल कि स्वतः बरोबर फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला त्याच्या batting चे वेड लावेल! लहानपणी बघितलेले ते स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करायचे ते झंझावाती वेड यामुळे तेव्हाचा छोटा सचिन आज मास्तर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झाला आहे. st childhoodलहानपणी पासून घरातले सगळे मोठे सांगतात कि वस्तूंची तोडफोड करू नका जे वस्तू  तोडतात ते वेडे असतात. पुढे शाळेतले शिक्षक सांगायचे कि स्वतः शी बोलणारे, दिवसा स्वप्न बघणारे, आपल्याच तंद्रीत राहणे हि सगळी वेड्यांची लक्षणे! मग कधी चुकून कुठला joke आठवला किवा late  current लागला आणि हसू आले तर मला एकदम शिक्षकांचे वाक्य आठवायचे, “स्वतः शी बोलणारे…” आणि मग सोलिड घाबरायला व्हायचे. बारावीत तर हे संकट अजूनच मोठ झालं. बोर्डाच्या परीक्षेसाठी शेवटी शेवटी खूप अभ्यास केला. रात्री तर जाऊद्या  पण दिवसासुद्धा क्रिकेट च्या बॉल मध्ये molecule दिसायचा तर फुटबाल मध्ये crystal structure ! मग तर अजूनच वाटायला लागला..”दिवसा स्वप्न बघणारे….”! हे संकट लवकरच टळल. परीक्षा झाली आणि निदान दिवसा तरी हे molecules डोळ्यापासून दूर गेले. अजूनही तसा chemistry  चा पेपर रात्री स्वप्नात दिसतो पण रात्री स्वप्न बघणारे वेडे नसतात न! सुट्टी चे प्लान बनवण्यात मी इतकी मग्न असायचे कि आई बोलावते हे देखील कळायचा नाही. एक दिवस आई म्हणाली,” काय आपल्याच तंद्रीत असतेस ग?” मग ‘तंद्री’ हा शब्द ऐकून टळेले संकट पुन्हा डोकावताना दिसाचे. सुट्टी मजेत चालली होती. Engineering करायचे म्हणून कधी जुना टेपरेकॉर्डर, transistor किवा mixer उघडून बघायचा. बरेचदा तर एकदा उघडलेला mixer परत निट लावता यायचा नाही मग ‘operation is successful but the patient is dead’ अशी त्या mixerची अवस्था! वस्तूंची तोडफोड झाली म्हणून बोलणे बसायचेच पण त्याहून जास्त आपण खरोखर वेडे आहोत का हा प्रश्न सारखा माझ्या डोक्यातच असायचा. Finally भगवान ने मेरी सुनली! म्हणजे माझ्या बहिणीने मला psychology ची काही पुस्तक वाचायला दिलीत. त्यातून मला कळले कि हि वेड्यांची नाही तर वेडाची लक्षणं चांगली आहेत! कारण मानस शास्त्राच्या भाषेत सांगायचे झाले तर – आपल्याच तंद्रीत राहणे म्हणजे focusing on your goals अर्थात ध्येय सिद्धी साठी एकाग्रता. स्वतःशी बोलणे म्हणजे self talk. शास्त्र शुद्ध दिवसा स्वप्न बघणे  म्हणजे visualization हे वाचून जणू मला आनंदाचा jackpot लागला.  वाचनाची आवड लागली आणि काही ‘वेड्यांची’ ओळख मला झाली, त्यांच्या बद्दल मला आदर वाटतो आणि त्यांच्या कडून शिकायच्या मी सतत प्रयत्नात असते. legendsवयाच्या तेविसाव्या वर्षी आपण graduation करून आपल्या कॅरीर च्या चिंतेत असतो. पण याच वयात सगळं काही सोडून ब्रिटीश सरकार विरुद्ध ‘इन्कलाब झिंदाबाद’ म्हणत फाशी वर चढणारा  भगत सिंग आणि त्याचे मातृभूमी साठीचे वेड! कुष्ट रोग्यांना जेव्हा समाजाने दूर लोटले तेव्हा एक ‘वेडा’ समोर आला, त्याने त्यांना नुसता आधारच नाही तर जीवनाची नवीन दिशा दाखवली. अनेक वर्ष जिद्दीने कार्य करणारे बाबा आमटे पूजनीय आहेत! हरियानाच्या छोट्याशा खेड्यातून केवळ आपल्या वेडापायी अंतराळापर्यंत पोहचलेली आणि आपल वेड शोधता शोधता त्यातच हरवणाऱ्या कल्पना चावला सारखे वेड कुणाला बर नको असेल? आपणच नाही तर आपल्या पणजी पणजोबांपासून दोन संगीत वेड्या त्यांच्या सुराने संपूर्ण भारताला मंत्रमुग्ध करत आहेत अश्या लता दीदी आणि आशा भोसले! ज्याच्या एका चौकार आणि षटकार वर भारतीयच नाही तर प्रतिस्पर्धी देशाचे नागरिक देखील खुश होतात असा क्रिकेट वेडा सचिन तेंडूलकर! हे अस काही असामान्य फक्त हे वेडेच करू शकतात. ते स्वतः तर खुश राहतातच पण आपल्यालाही खूप काही देवून जातात.तुमच्या आमच्या सारखे सर्वसामान्य लोक या वेड्यांची कामगिरी बघून फक्त कौतुकाने टाळ्या वाजौ शकतो. केवळ जीव आहे म्हणून आपण आलेला क्षण जगतो, स्वप्न सुद्धा चाकोरीत्लेच पाहतो, नऊ ते पाच च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न देखील करत नाही…आपल्या मनाला आपणच घातलेल्या नकोत्या नियमांमध्ये, नकोत्या शिस्तीत बांधून ठेवतो आणि मग ती स्वप्ने day dreaming बनून राहतात. अस मनाला अडकून, बांधून, मारुन मुटकून गप्प बसवून कस बर आपण खुश राहणार आणि काही असामान्य कामगिरी करणार? म्हणूनच थोडे वेडे व्हा! (original article written in August 2003)

Advertisements
This entry was posted in Think!. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s