हामखास झोप येण्याची गोष्ट – १

लहान मुलं झोपायच्या आधी ‘गोष्ट सांग’ असा हट्ट करतात. एक गोष्ट झाल्यावर अजून एक आणि अजून एक मात्र झोपेचा काही पत्ता नसतोच. मग गोष्ट सांगणाऱ्याला (झोपवणाऱ्या व्यक्तीला जेव्हा स्वतःलाच झोप येते त्यावेळेस) कापूस कोंड्याची गोष्ट किंवा ‘एक चिमणी येते एक दाणा खाते भूर उडून जाते’ अश्या काही गोष्टींचा आश्रय घ्यायला लागतो. असा जर अनुभव तुम्हाला आला असेल किंवा वारंवार येत असेल तर तुमच्यासाठी गुंडप्पाची गोष्ट आहे.

70k Thoughts - Page 1

गुंडप्पा, उत्तप्पा आणि अम्मा वैजयंती

एक गुंडप्पा असतो. तो चेन्नई मध्ये राहlत असतो. गुंडप्पाला उत्तप्पा खूप आवडत असतो. गुंडप्पाची आई, अम्मा वैजयंती खूप छान स्वयंपाक करत असते. इडली, डोसा उत्तप्पा, पोंगल, अप्पम, मेंदू वडे असे वेगवेगळे पदार्थ ती बनवते. पण गुंडप्पाला उत्तप्पाच आवडत असतो. एक दिवस अम्मा वैजयंती इडली सांबार बनवते. गुंडप्पा विचारतो,” पण आज उत्तप्पा का नाही केला?” अम्मा वैजयंती म्हणते,”गुंडप्पा आज नाही रे केला उत्तप्पा, उद्या करीन हं” आणि मग गुंडप्पा इडली खातो. दुसऱ्या दिवशी अम्मा वैजयंती उत्तप्पा, चटणी आणि सांबार बनवते. गुंडप्पा उत्तप्पा, चटणी आणि सांबार खूप आनंदाने खातो.  (जर आतापर्यंत झोप नाही अlली तर पुढची गोष्ट सांगा ).

गुंडप्पा कलकत्त्याला जातो

गुंडप्पा कलकत्त्याला जातो. तेथे त्याला मुखर्जी, चॅटर्जी आणि बॅनर्जी भेटतात. गुंडप्पा मुखर्जीला विचारतो,” मुखर्जी मुखर्जी इथे उत्तप्पा कुठे मिळेल?”, मुखर्जी म्हणतो,” अरे गुंडप्पा उत्तप्पा का शोधतोस?, इथे तुला सगळ्यात मस्त रोशगुल्ला मिळेल.” पण गुंडप्पाला मात्र उत्तप्पाच हवा असतो म्हणून तो चॅटर्जीकडे जातो आणि त्याला विचारतो ” चॅटर्जी चॅटर्जी इथे उत्तप्पा कुठे मिळेल?” चॅटर्जी म्हणतो,”अरे गुंडप्पा उत्तप्पा का शोधतोस?, इथे कलकत्त्यात तुला सगळ्यात मस्त सोनदेश मिळेल”. गुंडप्पा उदास होतो. मग बॅनर्जी ला एक कल्पना सुचते तो अम्मा वैजयंतीला फोने करतो आणि गुंडप्पाला आवडतो तसा उत्तप्पा कसा बनवायचा ते विचारतो. अम्मा वैजयंती बॅनर्जीला उत्तप्पा, चटणी आणि सांबार कसा बनवायचे ते सांगते आणि बॅनर्जी उत्तप्पा, सांबार आणि चटणी बनवतो. गुंडप्पाला तो उत्तप्पा खूप आवडतो आणि मग गुंडप्पा रोशगुल्ला आणि सोनदेश पण खातो आणि शांत झोपतो. (ही गोष्ट ऐकून मुलांचे डोळे जड होतील आणि ते लगेच झोपतील पण ही गोष्ट फlरतर्फार ४ ते ५ दिवस असरदार राहील, मग पुढची गोष्ट सांगा)

गुंडप्पा मुंबईला जातो

गुंडप्पा मुंबईला जातो. तेथे त्याला कुलकर्णी, देशपांडे आणि पाटील भेटतात. गुंडप्पा कुलकर्णीला विचारतो,” कुलकर्णी कुलकर्णी इथे उत्तप्पा कुठे मिळेल?”, कुलकर्णी म्हणतो,” अरे गुंडप्पा उत्तप्पा का शोधतोस?, इथे तुला सगळ्यात मस्त पुरणपोळी मिळेल.” पण गुंडप्पाला मात्र उत्तप्पाच हवा असतो म्हणून तो देशपांडेकडे जातो आणि त्याला विचारतो ” देशपांडे देशपांडे इथे उत्तप्पा कुठे मिळेल?” देशपांडे म्हणतो,”अरे गुंडप्पा उत्तप्पा का शोधतोस?, इथे मुंबईत तुला सगळ्यात मस्त थालीपीठ मिळेल”. गुंडप्पा उदास होतो. मग पाटीलला एक कल्पना सुचते तो अम्मा वैजयंतीला फोने करतो आणि गुंडप्पाला आवडतो तसा उत्तप्पा कसा बनवायचा ते विचारतो. अम्मा वैजयंती पाटीलला उत्तप्पा, चटणी आणि सांबार कसा बनवायचे ते सांगते आणि पाटील उत्तप्पा, सांबार आणि चटणी बनवतो. गुंडप्पाला तो उत्तप्पा खूप आवडतो आणि मग गुंडप्पा पुरणपोळी आणि थालीपीठ पण खातो आणि शांत झोपतो.

—————————————————————————————-

(गुंडप्पाच्या अनेक गोष्टी :अशा प्रकारे गुंडप्पाला लखनौमध्ये द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी भेटवा. कबाब, कटोरी चाट, पेठा असे उत्तर प्रदेशातले पदार्थ खाऊ घाला.जयपूरमध्ये अग्रवाल, जिंदाल आणि पालीवाल भेटवा आणि डाळ बाटी, घेवर, गट्टे कि सबझी असे राजस्थान मधले पदार्थ खाऊ घाला.

अहमदाबाद मध्ये पटेल, मोदी आणि शाह गुंडप्पाला ढोकळा, फाफडा, आणि ठेपले खाऊ घालतील. हैदराबाद मध्ये नायडू, राव आणि श्रीनिवास हे बिर्याणी, शीर खुर्मा आणि सामोसा ची ओळख गुंडप्पाला करून देतील. तसेच काश्मीरमध्ये मीर, भट आणि रिझवी हे दम आलू, पुलाव आणि काश्मिरी बैंगन ची ओळख करून देतील. अरुणाचल प्रदेश मध्ये ताशी, ताकु आणि ताकी हे पीठl, पुरा आणि लकसा ची ओळख करून देतील.)

 

 

 

Advertisements
This entry was posted in @Random and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s