हमखास जेवण करायची गोष्ट :१

“टीव्ही समोर असल्या शिवाय जेवतच नाही”, ” जेवण करायला खूप वेळ लावते”, मुलं जेवताना तुम्हाला जर अश्या समस्या असतील तर ही गोष्ट तुमच्या मदतीस येऊ शकेल.

हमखास जेवण करायची गोष्ट :१ हिमेस आणि कांताबेन

jevan

एक हिमेस असतो. तो हिंदी चित्रपटाची गाणी बनवत असतो. तो लहान असताना कांताबेन त्याला सांभाळत असते. एक दिवस त्याला एका गाण्याला संगीतबद्ध करायच (music द्यायच) असत. पण त्याला काही केल्या चाल (music ) सुचत नाही. तेवढ्यात त्याला कांताबेन ची आठवण येते. तो लहान असताना जेवायला खूप वेळ लावत असे आणि मग कांताबेन त्याला जेवण भरवत असे. जेवण भरवताना ” अरे हिमेस आ कर आ…आ….आ………….” (मुलांनी आ केल्यावर पटकन एक घास भरवा) एक्दम त्याला आयडिया येते आणि तो गाणं बनवतो – आ आ …आशिकीमे ‘तेरी….. जा जा …जाएगी जॉ मेरी (परत आ केल्या वर अजून एक घास भरवा). …आ आ ….आशिकीमे ‘तेरी….. जा जा …..जाएगी जॉ मेरी

काही दिवसांनी त्याला एक नवीन गाण बनवायचा असत पण परत त्याला काही सुचत नसत. पुन्हा त्याला कांताबेन ची आठवण येते. तो लहान असताना ती त्याचा अभ्यास घ्यायची आणि १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११,१२ ( बारा ..आ नंतर एक घास) झाल कि त्याला पुढे आठवायचच नाही. मग कांताबेन म्हणायची, ” अरे हिमेस बारानंतर तेरा तेरा तेरा”. (तेरा ..आ…अजून एक घास). मग हिमेस ला एक आयडिया येते आणि तो गाण बनवतो – दिलकी….सुरख दिवारोंपे …नाम तेरा तेरा ..नाम तेरा तेरा… नाम तेरा तेरा आ आ आ ..नाम तेरा तेरा (तेरा अजून एक घास).

हे दोन्ही गाणी सुपरहिट झाल्यावर हिमेसला वाटतं प्रत्येक गाण कांताबेन ला आठवूनच बनवावे. मग तो अजून एक गाण बनवतो ऊऊऊऊ हुजूऊऊऊर तेरा तेरा तेरा (तेरा आ – घास भरवायला विसरू नका) सुरुऊऊऊर, … तेरा तेरा तेरा सुरुऊऊऊर.

असच एकदा गाण बनवताना हिमेसला आठवत कि पाहुणे आले कि कांताबेन त्याला सांगायची,” हिमेस या म्हण या आ आ”. आणि हिमेस गाण बनवतो आशिक बनायाआ आ आ …आशिक बनायाआ आ आ ..आशिक बनायाआ आ आ ..आपने.

असे गाणे बनवून हिमेस ची झाली गोष्ट आणि भरल तुमचं पोष्ट (खरोखरच).

Disclaimer / अस्वीकारण : गोष्टीतले सगळे गाणे खरे असले तरी पात्र काल्पनिक आहेत. हिमेस चा हिमेश रेशमिया शी काहीही संबंध नाही. हि गोष्ट फक्त मुलांना जेवण भरवण्याच्या हेतूनेच लिहिलेली आहे.

 

Advertisements
This entry was posted in @Random and tagged , . Bookmark the permalink.

2 Responses to हमखास जेवण करायची गोष्ट :१

  1. Snehal Joshi says:

    Lovely!! enjoyed the story 🙂

  2. Thank you Snehal Joshi 🙂 Glad you liked it!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s