हमखास झोप येण्याचे उपाय (मोठ्यांसाठी)

जस हिंदी चित्रपट सृष्टीत काळाप्रमाणे वेगवेगळ्या हिरो हेरॉईन ची craze असते (राज कपूर ते रणबीर आणि नर्गिस ते माधुरी आणि आता दीपिका) तसेच देव देवींची पण craze असावी. कधी विष्णू कधी शिव, गणपती तर कधी शनी महाराज आणि संतोषी माता. आज पासून पुढे दोन -चार वर्षात कोण चित्रपटसृष्टीचा super star असेल माहित नाही पण सगळ्यात जास्त फॅन फोल्लोविंग म्हणजे आराधना एकाच देवीची होणार हे नक्की! ती म्हणजे – निद्रा देवी.

लहानपणी ‘निद्रादेवीची आराधना’ नावाचा धडा माझ्या मोठ्या बहिणीच्या पुस्तकात होता. आमच्यावेळेस नेमका अभ्यासक्रम बदलला, त्यामुळे फारसे काही आठवत नाही. मात्र अधूनमधून बहिणीच्या अभ्यासात ढवळाढवळ करताना धड्याचे शीर्षक फारच मनाला भावले होते. आता असे वाटते कि धड्याच्या लेखकाला खूप दूरदृष्टी असावी कारण आज काल लहान मुलांना झोपवण्यापेक्षा मोठ्यांना ‘झोप येत नाही’ ही जास्त कठीण समस्या घराघरात दिसते आहे.

लहान मुलांना तरी गोष्ट सांगून, रागावून नाहीतर मारून मुटकून झोपवू शकतो पणमोठ्यांच काय? असे जर मोठे तुम्ही असाल किंवा तुमच्या घरात कोणी असतील तर त्यांच्या साठी हे हमखास झोपेचे उपाय (कुठल्याही अतिरिक्तपरिणामांशिवाय = कुठले ही side effect नाही)
Article Illustrations - Page 17
हे उपाय नीट वापरल्यास कुठे ही निद्रादेवी प्रसन्न होईल, झोप येईल याची १०० % खात्री.
सगळे उपाय कसे वापरावेत याची सविस्तर माहिती प्रत्येक उपायांच्या खाली प्रक्रिया, पारियाय, आणि खबरदारी अश्या तीन टप्प्यात मांडली आहे. उपाय करण्याच्या आधी तुम्ही बिछान्यावर / पलंगावर/ कुठेही झोपlयच्या इच्छेने डोळे बंद करून निजला आहात किंवा बसला आहात हे पूर्वपक्षीत आहे. (प्रवासात निजता येत नाही आणि बसल्या बसल्या झोपावे लागते)

१. एक ते हजार अंक मोजा.
उपाय प्रक्रिया : शंभर नंतर एक नाही एकशेएक, एकशेदोन …दोनशे, दोनशे एक…नवशे नव्याणनवं, हजार असे मोजावे. जास्तीत जास्त एकशे साठ ला झोप येईल.
पारियाय: मराठीतच गुण आहे अस नाही हे अंक कुठल्या ही भाषेत मोजले तरी चालतील.
खबरदारी: लक्षात असू देत कि हा झोपेचा उपाय आहे, हजार पर्यंत मोजण्याची परीक्षा नव्हे तेव्हा अति लक्ष देऊन जागून हजार पर्यंत मोजू नका.

२. मनातल्या मनात स्तोत्र म्हणा
उपाय प्रक्रिया : तुम्हाला जे स्तोत्र येते ते मनातल्यामनात म्हणत राहा. रामरक्षा, अथर्वशीर्ष असे मोठे स्तोत्र म्हंटले तर बहुतेक अर्द्यातच झोप येईल पण शुभंकरोतु असेल तर ५ – ६ वेळा म्हंटल्यावर झोप यायला हरकत नाही. शक्यतो मोठे स्तोत्र म्हणा.
पारियाय: स्तोत्र येत नसतील तर आरती म्हंटली तरी चालेल. ते ही येत नसेल तर कुठल्या ही चित्रपटातल गाणं म्हंटलं तरी चालेल. अगदी हिमेश च गाणं सुद्धा चालेल.
खबरदारी: चित्रपटातल गाणं म्हणार असाल तर ते मंद लयीच, मृदू शब्दांच असावा, देवाच असल्यास उत्तम पण selfie ले ले सारखा असेल तर हे गाणं झोपेचा उपाय आहे आणि गणपतीच्या मिरवणुकीत नाचायची प्रॅक्टिस नाही हे लक्षात असो.

३. मुचकुंद ऋषी
उपाय प्रक्रिया: मुचकुंद ऋषी या नावाचा जप करावा डिड दोन मिनिटात झोप येईल, हे ऋषींना मिळाले वरदानच आहे कि जो त्यांच्या नावाचा झोपताना जप करेल त्याला लगेचच निद्रा देवी प्रसन्न होईल. जिज्ञासू वाचकांसाठी मुचकुंदांची गोष्ट या दुव्या वर – https://en.wikipedia.org/wiki/Muchukunda
पारियाय: मुचकुंडांसारखे वरदान तर कोणाला मिळालेले आढळत नाही. तरी पर्याय म्हणून, हरे कृष्ण हरे राम, पांडुरंग, ओम नमः शिवाय असे तुम्हाला आवडतील ते जप केले तरी चालतील ३-४ मिनिटात झोप यायला हरकत नाही. प्रयोग म्हणून स्वतःच्या नावाचा जप करावा आणि किती वेळात झोप येते हे आम्हाला कळवावे.
खबरदारी: वरिष्ठाधिकाऱ्याच्या (bossच्या ) नावाचा जप करून झोपेत भयानक स्वप्न दिसलीत तर तो side इफेक्ट नाही पण main इफेक्ट आहे त्यामुळे सावधान.

४. चार अंक मोजत श्वास घ्या, सहा मोजत सोडा
उपाय प्रक्रिया : सोपे आहे – चार अंक मोजत श्वास घ्या, सहा मोजत सोडा आणि हीच श्वासाची लय चालू द्या.
पारियाय: कितीही अंक मोजत श्वास घेऊ -सोडू शकतात पण पुन्हा पुन्हा तसाच श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असे नाही कि आत्ता ३ अंक मोजत घेतला आणि नंतर ४ अंक मोजत.
खबरदारी: हा रामदेवबाबाचा प्राणायाम नाही त्याचमुळे श्वास पोटातून घ्याचा, छातीतून कि घशातून या विचारांमध्ये रात्र जागवू नका.

आता उपाय माहिती झाले तर झोपेची वेळ झाली कळण्यासाठी मोबईल वर गजर लावा !

अस्वीकरण (Disclaimer) : हा लेख थोडा मनोरंजक व्हावा म्हणून थोडा विनोदभावाने लिहिला आहे, कुठल्या गोष्टी पटल्या नाही तर विनोदाचा भाग म्हणून सोडून द्याव्यात. त्याच बरोबर स्तोत्र म्हणायला पारियाय म्हणून चित्रपटाची गाणी असे लिहिल आहे. त्यात कुठल्याही धर्म / पंथाचा विषय नाही, तो केवळ एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे कि कुठल्याही एका गोष्टीवर मन एकाग्र केल्यास मन शांत होते आणि झोप येते. झोप न येण्याच कारणच मुळात अशांत मन असावे.

 

 

Advertisements
This entry was posted in @Random and tagged , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s